यशोगाथा : अतुल झोपे

0

यशोगाथा : अतुल झोपे

परिचय पत्र

नाव: अतुल झोपे
वय: ६० वर्षे
उंची: १६८ सेंमी
व्यवसाय: निवृत्त (डिलिव्हरी मॅनेजर)
वास्तव्य: पुणे
समूह: डीआरसी पुणे
मोबाईल: ९९२३७९५७७०

माझी परिवर्तन कथा

मला गेल्या १२ वर्षांपासून मधुमेह आहे. मी जेव्हा जेव्हा माझ्या फॅमिली डॉक्टरांकडे गेलो, तेव्हा ते फक्त औषधांच्या गोळ्यांचा डोस बदलत असत, पण कधीही औषधं कशी कमी किंवा बंद करायची याबद्दल काही सांगितलं नाही.
निवृत्तीनंतर मी दिवसातून अनेक वेळा खाणं सुरू केलं आणि त्यामुळे माझे एचबीएवनसी ७.३% पर्यंत वाढले. डॉ. दीक्षित जीवनशैलीबद्दल मला माझ्या मित्रांमार्फत आणि सोशल मीडियावरून माहिती होती, पण ती पाळायची कधी कल्पनाही केली नव्हती. नाश्ता न करता दिवसातून फक्त दोन वेळा जेवण घेणं शक्य आहे, असं मी कधी विचारही केला नव्हता. पण साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे मी डॉ. दीक्षित जीवनशैली स्वीकारायचं ठरवलं आणि पुण्यातील त्यांच्या केंद्राला भेट दिली.
सुरुवातीला, पहिले ४-५ दिवस सकाळी भूक लागायची कारण मी वर्षानुवर्षं नाश्ता करत आलो होतो. पण नंतर मला दिवसातून दोन वेळा जेवण्याची सवय लागली. मी आधीही चालायला जायचो, पण या जीवनशैलीमुळे मी आता हळू धावत ४० मिनिटांत ४.५ किमी अंतर पूर्ण करू शकतो, आणि पुढे ते अंतर वाढवण्याचा माझा मानस आहे. मी कधीही विचार केला नव्हता की मी ४ किमी धावू शकेन आणि तेही थकवा न येता!
गेल्या तीन महिन्यांपासून मी नियमितपणे जीवनशैली, योग्य आहारक्रम आणि व्यायाम पाळत आहे. आता माझे एचबीएवनसी ७.३ वरून ५.७% वर आला आहे. माझं वजन ६ किलोने कमी झालं असून कंबरेचा घेर ७ सेंमीने घटला आहे. माझ्या गोळ्या लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत आणि मला खात्री आहे की पुढच्या महिन्यात त्या पूर्णपणे बंद होतील. मला पूर्वी पोटदुखी आणि अॅसिडिटीचा त्रास होत असे, पण आता तो पूर्णपणे नाहीसा झाला आहे. दिवसातून दोन वेळा जेवूनही मी नेहमी ऊर्जावान राहतो आणि मला कधीच अशक्तपणा जाणवत नाही, उलट हलके आणि उत्साही वाटते.
मी ही जीवनशैली कायमस्वरूपी पाळण्याचा निर्धार केला आहे आणि साखरेसाठी कोणतीही औषधं न घेता आरोग्यदायी जीवन जगण्याचा माझा प्रयत्न आहे. मी माझ्या नातेवाईक आणि मित्रांमध्ये या जीवनशैलीबद्दल जागृती निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
मी डॉ. दीक्षित सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानतो, ज्यांनी हे अभियान मोफत सुरू केले आहे. सर्वच डॉक्टरांनी आपल्या रुग्णांना अशी सोपी आणि प्रभावी जीवनशैली सांगावी, अशी माझी इच्छा आहे.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts