यशोगाथा : चंद्रकांत वाघमारे

0

यशोगाथा : चंद्रकांत वाघमारे

परिचय पत्र

नाव: चंद्रकांत वाघमारे
वय: ४९ वर्षे
ऊंची: १६७ सेमी
वास्तव्य : शेळगाव (नायगाव),नांदेड
व्यवसाय: सहा. शिक्षक
समूह: छ.संभाजीनगर (७ वे आव्हान)
मोबाईल: ९५५२०५५९६०

माझी परिवर्तन कथा

मी , चंद्रकांत वाघमारे शेळगाव(गौरी) ता. नायगाव जि. नांदेड येथे राहत असून जिजामाता कन्या शाळा, धर्माबाद जि. नांदेड येथे सहा. शिक्षक पदावर कार्यरत आहे. मी नुकतीच माझी रक्त चाचणी केली त्यावेळी मला चाचणीत उपाशीपोटी रक्त शर्करा १४५ व जेवणानंतर २८८ आढळून आली. यापूर्वी मला मधुमेह नसल्याने या अहवालामुळे मी फार व्यथित झालो कारण यापूर्वी मला मधुमेह नव्हता. मी चाचणी अहवाल डॉक्टरांना दाखविल्यावर त्यांनी त्वरित ५०० mg च्या metformin च्या गोळ्या रोज सकाळ संध्याकाळ २ याप्रमाणे घेण्यास सांगितल्या. त्या वेळी रक्तदाब मोजला असता तो देखील ९०/१४० असा आढळून आला. मधुमेह व उच्च रक्तदाब असे दोन्ही आजारांचे निदान झाल्याने मी माझे आरोग्य चांगले राहिले नाही या विचाराने अस्वस्थ होतो. त्यावेळी माझे वजन ७६ कि. ग्रॅ. व कंबरेचा घेर १०४ सें.मी.असा होता. मी माझे आरोग्य कसे सुधारावे या चिंतेत असताना माझे शाळेतील सहकारी श्री.
दंतलवाड सर यांनी डॉ. दीक्षित सर व ते सांगत असलेल्या जीवनशैली विषयी सविस्तर माहिती दिली.त्यांनी सोबतच मला पाठवलेले व्हिडिओ मी पाहिले. व्हिडिओ पाहता क्षणी मला आपण हे करून मधुमेह मुक्त व्हावेअसे वाटले. त्याच सुमारास दंतलवाड सरांनी मे महिन्याच्या शेवटी एक लिंक पाठविली व ७ व्या वजन कमी करणे व मधुमेह मुक्त आव्हानाची माहिती देऊन सहभागी होण्यास सांगितले. १ जून पासून सुरू झालेल्या आव्हानात मी आमच्या छ. संभाजीनगर समूहात दिलेल्या प्रत्येक सूचनेचे व नियमाचे काटेकोरपणे पालन करणे सुरू केले. आहार व व्यायामाविषयी दिलेल्या कोणत्याही सूचनेचे पालन कोणतीही कसूर न करता केले. मी ९० दिवसात १००% जीवनशैलीचे पालन केले. त्यामुळे दिवसागणिक मला माझ्या प्रकृती मधे होणारी सुधारणा जाणवू लागली. त्यामुळे मला उत्साहवर्धक वाटू लागले.
या जीवनशैली मुळे च केवळ ९० दिवसात माझे आव्हानाच्या आधी असलेले ७.६ एचबीए१सी १.७ ने कमी होऊन ५.९ वर आले. वजन ७६ कि.ग्रॅ. वरून १० कि.ग्रॅ. ने कमी होऊन ६६ कि.ग्रॅ. वर आले. तसेच कंबरेचा घेर १०४ सें.मी. वरून १५ सें.मी. ने कमी होऊन ८९ सें.मी. वर आला. मी मधुमेह मुक्त होऊन डॉक्टरांनी माझी मधुमेहाची औषधे बंद केली त्यामुळे मी मधुमेह मुक्त झालो. डॉ. दीक्षित सरांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे मी मधुमेह मुक्त होऊ शकलो. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. तसेच आमच्या समूहाचे प्रमुख श्रीनिवास बोलाबतीन सर, मुकुंद वाजळे सर व निखिल नाफडे सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून माझा उत्साह वाढवला त्या बद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या जीवनशैलीचे मी नेहमीसाठी पालन करेन व ओळखीच्या लोकांना या विषयी माहिती देईन.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts