आजचा प्रश्न : मधुमेह किती प्रकारचे असतात? प्रकार-१ व प्रकार-२ या दोन प्रकारच्या मधुमेहात काय फरक असतो? आपली सुनियंत्रित आहार योजना अनुवांशिक रोगांवर आणि मधुमेहावर परिणामकारक आहे काय? ( १२ ऑक्टोबर २०२५ )

0

आजचा प्रश्न : मधुमेह किती प्रकारचे असतात? प्रकार-१ व प्रकार-२ या दोन प्रकारच्या मधुमेहात काय फरक असतो? आपली सुनियंत्रित आहार योजना अनुवांशिक रोगांवर आणि मधुमेहावर परिणामकारक आहे काय? ( १२ ऑक्टोबर २०२५ )

आजचा प्रश्न

प्रश्न: मधुमेह किती प्रकारचे असतात? प्रकार-१ व प्रकार-२ या दोन प्रकारच्या मधुमेहात काय फरक असतो? आपली सुनियंत्रित आहार योजना अनुवांशिक रोगांवर आणि मधुमेहावर परिणामकारक आहे काय?

उत्तर: मधुमेहाचे बरेच प्रकार आहेत. पहिल्या प्रकारचा मधुमेह १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या (किशोर वयोगटाच्या) लोकांनाच होतो. या प्रकारच्या मधुमेहींचे शरीर इन्शुलिन बनवतच नाहीं. यावर इलाज म्हणजे इन्शुलिन इंजेक्शन रूपाने देणे.
दुसऱ्या प्रकारचा मधुमेह (ज्याला प्रौढपणी सुरू होणारा मधुमेह असेसुद्धा म्हणता येईल) वयाच्या चाळिशीनंतर उद्भवतो.
या प्रकारच्या मधुमेहींमध्ये रोग्यांचे शरीर हवे तितके वा त्याहूनही जास्त इन्शुलिन बनविते पण हे इन्शुलिन परिणामकारक नसते.
रक्ताची तपासणी करवून HbA1C व उपाशीपोटीच्या इन्शुलिनची मात्रा माहीत करून घेतल्याने आपल्याला रोग्याच्या स्वादुपिंडाच्या कार्यक्षमतेबद्दल महत्वाची माहिती मिळते.
दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहावरील इलाज तोंडी औषधोपचाराने केला जातो व तरीही रक्तशर्करा हवी तितकी कमी होत नसल्यास इन्शुलिन दिले जाते.
आपली सुनियंत्रित आहार योजना दूसऱ्या प्रकारच्या मधुमेहाने नव्याने पीडित झालेल्यांना उपयुक्त आहे, पण पहिल्या प्रकाराच्या मधुमेहासाठी उपयुक्त नाहीं.
आपली आहार योजना स्थूलत्व व उच्च रक्तदाबाच्या रोगांसाठी फायदेशीर आहे पण ती कांही “लाख दुखोंकी एक दवा” बिलकुल नाहींय् हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे!

(मराठी अनुवाद: श्री सुधीर काळे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts