यशोगाथा : मनीष पाटील (२ ऑक्टोबर २०२५)

0

यशोगाथा : मनीष पाटील (२ ऑक्टोबर २०२५)

परिचय पत्र

नाव: मनीष पाटील
वय: ५३ वर्षे
उंची: १६५ सेंमी
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: जनरल मॅनेजर
समूह: DM 12
मोबाईल: ९३२६४४०९९५

माझी परिवर्तन कथा

दिनांक ०१.०५.२०१९ रोजी माझे हाय बीपी व मधुमेह (एचबीएवनसी ८.३%) निदान झाले. त्या वेळी माझे वजन ८२ किलो होते. अनेक प्रयत्न करूनही वजन वाढून ८४ किलो व एचबीएवनसी १०% झाले. त्यावेळी एका मित्राने मला डॉ. दीक्षित जीवनशैलीबद्दल सांगितले. मी सर्व व्हिडिओ पाहिले व माहिती गोळा केली. मी ठरवले की ही जीवनशैली अवश्य अवलंबावी. पहिले १५ दिवस मला कठीण गेले पण तरीही मी १५ दिवसांत २०० ग्रॅम वजन कमी केले.
यानंतर मार्च २०२० मध्ये मी DRC ला गेलो व त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध पद्धतीने डॉ. दीक्षित जीवनशैली अवलंबायला सुरुवात केली. पुढील तीन महिन्यांत माझे वजन ७१ किलोवर आले व एचबीएवनसी ६% झाले. माझ्या सर्व औषधांचा पूर्णपणे बंद झाला व आता मी स्वतःला पूर्णपणे तंदुरुस्त समजतो.

काही दिवसांनी मी डॉ. दीक्षित फॅन्स ग्रुपमध्ये सामील झालो व साप्ताहिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन खूप प्रेरणा मिळाली. आमच्या गटाला मासिक स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला.
सुरुवातीला मला ५० मिनिटांत १.५ किलोमीटर चालणेही शक्य होत नव्हते. पण आता मी दररोज १ तास ४५ मिनिटांत १० किलोमीटर चालतो. मी ५ तासांत २१ किलोमीटर वॉकेथॉन पूर्ण केला आहे. तसेच मी टाटा मॅरेथॉन २०२६ मुंबईसाठीही पात्र ठरलो आहे.
मी ठरवले आहे की डॉ. दीक्षित यांच्या या उदात्त कार्यात मी मदत करणार आहे. ही जीवनशैली मी कायम पाळणारच आणि इतरांनाही तिचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे.

(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts