यशोगाथा : दिपाली भोईटे
परिचय पत्र
नाव: दिपाली भोईटे
वय: ५९ वर्ष
उंची: १५९ सेंमी
व्यवसाय: मुख्याध्यापक
वास्तव्य: कोल्हापूर
मोबाइल: ९४२११११६०५
माझी परिवर्तन कथा
मागील काही वर्षांपासून म्हणजे २०१० पासून मला डायबीटीसची औषधे घ्यावी लागत होती दिवसातुन तीन वेळा गोळ्या व संध्याकाळी जेवणापुर्वी इन्सुलीन घ्यावे लागत होते. सुरवातीला आठ पॉइंट घेणारे इन्सुलीन वाढत जाऊन अठरा झाले होते. मे २०२२ मध्ये माझे युटेरस काढावे लागले. ऑपरेशन वेळी पोटावर असणारी माझी चरबी हीच माझी समस्या होती. माझी औषधे वाढतच होती. माझ्या कानातही सतत इन्फेक्शन होत असे. दिवाळीपूर्वी मी डॉ दीक्षित सरांना फोन केला. मला प्रथम वाटले की हे इतके मोठे डॉक्टर कशाला आपली दखल घेतील, पण आश्चर्य असे की त्यांचा मला दोनच मिनिटात रिप्लाय आला. मला त्यांनी श्रुती मॅडमचा फोन नंबर दिला. सुरवातीला मला हा डाएट प्लॅन अजिबात जमत नव्हता कारण मला सकाळी नाष्टा करावाच लागे. नाही खाल्ले तर माझे हात थरथरत असत. त्यामुळे माझी केस त्यांनी डॉ नंदकुमार हाडगेकर सरांकडे पाठवली आणि मला अक्षरशः परमेश्वरच भेटला. त्यांनी माझ्या सर्व टेस्टचे रिपोर्ट पाहिले व मला मार्गदर्शन चालु केले. मी काय खावे, कशा प्रकारे खावे या बरोबर गोड अजिबात न खावे इ. शास्त्रीय माहिती दिली. आता मी रोज सकाळी ४ कि.मी. पायी चालते. मी सकाळी १.०० व संध्याकाळी ७ वाजता जेवते. दोन्ही जेवणात मी आधी बदाम, अक्रोड, सलाद, मोड आलेली कडधान्ये व नंतर एक चपाती व भाजी खाते. पुर्वी माझे एचबीएवनसी ९.४% असत होते. ते हळु हळु कमी होऊ लागले. आता माझे इन्सुलिन पूर्ण बंद झाले असुन दुपारची एक गोळीही बंद झाली आहे. इतकी औषधे कमी करूनही माझे एचबीएवनसी ७.२% झाले आहे. पूर्वी ८५ किलो असणारे माझे वजन आता ७३ किलो झाले आहे. माझ्या पोटावरील चरबी प्रथमतः कमी होत गेली. वजन कमी झाल्याने माझा हात दुखत असे तो कमी झाला. हलके वाटत असल्याने फ्रेश वाटते. कानाचा प्रॉब्लेम कमी झाला. मला महिन्याला ५०००/- रू.ची औषधे घ्यावी लागत ती कमी होऊन सद्या फक्त १०००/- रु.ची औषधे लागतात. पण मला खात्री आहे माझी ही सुध्दा औषधे कमी होतील. डॉ. दीक्षित सरांना व सतत मला मार्गदर्शन करून इथपर्यंत घेऊन येणारे डॉ. हाडगेकर सरांना मनापासुन धन्यवाद देते. मी ही जीवन शैली अशीच चालू ठेवणार आहे. अपेक्षा बाळगते कि पुढील तीन महिन्यात मी मधुमेह-मुक्त होवून जाईन. मी मा. डॉ. दीक्षित सरांप्रति कृतज्ञता व्यक्त करते.

