यशोगाथा : दुर्गा सरकाळे

0

यशोगाथा : दुर्गा सरकाळे

परिचय पत्र

नाव: दुर्गा सरकाळे
वय: २७ वर्ष
उंची: १५२ सेमी
व्यवसाय: विद्यार्थी
वास्तव्य: हिंगोली (वसमत)
मोबाईल: ७०५७४२५५०१

माझी परिवर्तन कथा

माझे नाव दुर्गा सरकाळे असून माझे वय २७ वर्ष आहे. मला गेल्या कितीतरी वर्षांपासून थायरॉईड , उच्च रक्तदाब, नैराश्य , पीसीओडी, मधुमेह अशा आजारांच्या गोळ्या चालू आहेत . थायरॉईड मुळे माझा लठ्ठपणा खूप वाढत गेला म्हणजे वजन ८२ किलोचा आकडा पार करून पुढे गेला. त्यामुळे मला खूप मानसिक तणाव आला होता .कारण मला पायऱ्या चढताना होणारा त्रास, पोट बाहेर निघाल्यामुळे अभ्यासाला बसता न येणे , सतत येणारा आळस ह्या सगळ्यांच कारण पाहता मला लठ्ठपणा आहे हे जाणवले. कित्येक डॉक्टर मला सांगायचे की वजन कमी कर पण ते माझ्याकडून व्हायचं नाही. कारण ते फक्त वजन कमी कर इतकंच सांगायचे पण कस कमी करायचं हे कोणीही सांगत नसे . असच मी एकदिवस ठरवलं काही करून आपल्याला वजन कमी करायचेच आहे. मी ह्यासाठी यूट्यूब चॅनेल वर कित्येक आहाराविषयी चित्रफीती पाहिल्या. पण त्या आपल्या रोजच्या जीवनशैलीशी जुळणाऱ्या नव्हत्या. मग डॉ. दीक्षित सरांचा जीवनशैली बद्दल चित्रफीत पाहिली आणि ती मी पुन्हा पुन्हा ऐकत गेले. ही जीवनशैली म्हणजे आपल्यासाठी वजन कमी करण्याचं एक मोठ वरदान आहे. कारण ना पैशाची गरज आहे ना कोणते महागडे उत्पादने घेऊन वजन कमी करायचं नव्हते. रोजच्या जीवनशैलीशी निगडीत आहे त्यामुळे मी ठरवलं हीच जीवनशैली अंमलात आणायची. मला श्री. संजीव सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केले. प्रत्येक गोष्ट नीट समजावून सांगितली आणि मी त्या सगळ्या गोष्टी नीट पाळल्या. एकही गोष्ट चुकीची करायची नाही हे ठरवले. ह्यामुळेच माझे वजन ८२ वरून ६२ किलो पर्यंत येऊन पोहचले . तब्बल अडीच महिन्यात मी २० किलो वजन कमी केले आणि माझे उपाशीपोटी इन्सुलिन १२.५५ इतके होते तर आता ते ३.७४ वर आले. एचबीएवनसी ५.२ वरून ४.७% पर्यंत आले. पोटाचा घेर ९७ सेमी. वरुन ८० सेमी. वर आला. डॉ. दीक्षित जीवनशैली सर्वोत्तम आहे आणि कितीतरी आजार दूर होतात . Dr. Dixit sir and Sanjiv sir you are God for me.
हे मी म्हणेल कारण ह्यांच्याशिवाय माझे वजन कमी होणे शक्य नव्हते .ही जीवनशैली म्हणून आपण प्रत्येकाने जोपासायला हवी . रोजच्या जीवनात फक्त दोन वेळ खा आणि नक्कीच लवकर बरे व्हा .ही खूप भारी जीवनशैली आहे प्रत्येकानं त्याची अंमलबजावणी केली पाहिजेच आणि कित्ती रोगांना पूर्णविराम दिला. इथून पुढे सुद्धा मी हीच जीवनशैली चालू ठेवेन .

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts