यशोगाथा : प्रशांत त्रंबके

0

यशोगाथा : प्रशांत त्रंबके

परिचय पत्र

नाव: प्रशान्त त्रंबके
वय: ३९ वर्षे
उंची: १७४ सें.मी.
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
मोबाइल ७७७४००९०५२

माझी परिवर्तन कथा

मी प्रशांत त्रंबके ३९ वर्षांचा आय. टी. इंजिनियर आहे. या करियरमध्ये काम करतांना आमची जी जीवनशैली असते. त्यात आरोग्य हे शेवटच्या प्राधान्यक्रमावर येते. माझे वजन पण त्यामुळे ९४ किलो झाले होते. अशाच एके दिवशी मला मधुमेह झाल्याचे कळले. त्यावेळी माझे एचबीएवनसी ११.२% होते. आता मात्र मला माझ्या तब्येतीबद्दल काही तरी ठोस निर्णय घ्यायलाच हवा होता.
मी डिसेंबर २०२३ मध्ये मनाशी निर्णय घेतला आणि पूर्ण कमिटमेंटने डॉ. दीक्षित यांची जीवनपद्धती अवलंबिण्याचा ठरवले. मी पुण्याच्या D R C मध्ये गेलो. तिथे मला डॉ दीक्षित जीवनशैलीबद्दल पूर्ण माहिती दिली. लगेचच मी ही जीवनशैली सुरु केली. खर तर सुरुवातीला ही जीवनशैली खूप कठीण गेली. पण मी जिद्दीने दोन जेवणावर माझे लक्ष केंद्रित केले. सेंटरमध्ये सांगितलेला जेवणाचा क्रम तंतोतंत पाळला. त्याचा मला खूप फायदा झाला. याचा परिणाम माझ्या साखरेवर व वजनावर सकारात्मक झाला. माझे वजन ४/५ महिन्यात ९८.९ वरुन ८४.९ वर आले. (१४ कि. कमी) एचबीएवनसी ११.२ वरुन ५.२% (६ युनिट). हे सर्व मी सुरुवातीला घेत असलेली औषधे कमी करत करत हळूहळू बंद करुन साध्य केले.
मी स्वतः आय. टी. इंजिनियर असल्याने मी हेल्थ ॲपच्या सहाय्याने माझा व्यायाम, चालणे व शुगरचे संपूर्ण रेकॉर्ड ठेवत होतो. पण या सर्व प्रवासात मला माझ्या कुटुंबाची खूप साथ मिळाली. त्यांच्या पूर्ण सपोर्ट मुळेच मी हा मधुमेह ते मधुमेह मुक्त्त प्रवास करु शकलो. हा मधुमेह ते मधुमेह मुक्त्त प्रावस करु शकलो. याचा परिणाम मी माझ्या हानिकारक खाण्याच्या (unhealthy eating habits) सवयींवर मात केली.
माझे वय सध्या ३९ असल्यामुळे चांगल्या करियरकरता मला चांगले आरोग्य असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे याची मला जाणीव झाली. ही जीवनशैली मी आयुष्यभर पाळणार आहे. जसजसे माझे वजन व एचबीएवनसी कमी होत गेले व त्यांचे रिझल्ट पाहून मी प्रत्येक वेळी स्वतःच मोटिव्हेट होत होतो. आता माझा प्रवास आरोग्यपूर्ण जीवनाकडे सुरु आहे. याचे सर्व श्रेय डॉ. दीक्षित सर व त्यांच्या सर्व टीमला जाते. मी त्यांचा खूप आभारी आहे.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts