यशोगाथा : :पंकज गुडेकर (१० सप्टेंबर २०२५)
परिचय पत्र
नाव:पंकज गुडेकर
वयः ३६ वर्षे
उंचीः १७६सेंमी
व्यवसायः किराणा दुकान
वास्तवः सोलापूर, वडशिंगे
समुहः RMI DYDN 7TH
मोबाईल: ९९२१०३३२६१
माझी परिवर्तन कथा
मागील साडेचार महिन्यापूर्वी माझे पाय दुखत व मुंग्या येत असल्यामुळे डॉक्टरांनी शुगर चेक केले. १० एप्रिल २०२५ रोजी माझे एचबीएवनसी ९ % आले. हा रिपोर्ट पाहून मला धक्का बसला. त्यावेळी आमचे सहकारी मार्गदर्शक विलासजी गोसावी हे डॉ दीक्षित जीवनशैलीचे पालन करत होते. त्यांनी मला सर्व माहिती दिली. त्यावेळी माझे वजन ८६ किलो होते. मी १० एप्रिल पासून जीवनशैलीचे पालन चालू केले. मी ७व्या 90 दिवसांच्या challenge मध्ये सुद्धा भाग घेतला.


एक जून २०२५ ला पद्मा मॅडम यांनी तपासण्या करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यावेळी माझे एचबीएवनसी ७.८% व उपाशीपोटी इन्सुलिन ४.६७ होते. मी चॅलेंजचे नियम तंतोतंत पाळले. मी रोज पाच ते सात किलोमीटर पायी चाललो व मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे आहार घेतला व त्यामुळे मला चांगले रिझल्ट मिळाले. २६ जून २०२५ ला माझे एचबीएवनसी ६% आणि २७ जुलै २०२५ ला ५.५% व वजन ८० किलो झाले. हे रिपोर्ट पाहून मला खूप आनंद झाला.
मी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सर व त्यांची सर्व टीम आणि नव्वद दिवस चॅलेंज मधील एडमिन यांचे मनापासून आभार मानतो. मी, ही जीवनशैली आयुष्यभर पाळण्याचा निर्धार केला आहे.
(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)