आजचा प्रश्न : कोणत्याही पदार्थामुळे होणाऱ्या इन्सुलिन स्त्रावणाची चाचणी कशी करावी? (४ सप्टेंबर २०२५)

0

आजचा प्रश्न : कोणत्याही पदार्थामुळे होणाऱ्या इन्सुलिन स्त्रावणाची चाचणी कशी करावी? (४ सप्टेंबर २०२५)

आजचा प्रश्न

प्रश्न: कोणत्याही पदार्थामुळे होणाऱ्या इन्सुलिन स्त्रावणाची चाचणी कशी करावी?

उत्तर: ह्या प्रश्न विचारल्या बद्द्ल आपला आभारी आहे!
बरेच लोक आप आपल्या आवडीचे पदार्थ खाऊ/पिऊ इच्छितात. आम्हीही बऱ्याच पदार्थांची इन्सुलिन स्त्रावणा साठी चाचणी करून घेतली आहे परंतु त्यात काही समस्या आहेत:
१) सर्वच पदार्थांची चाचणी केलेली नाही.
२) आपण ज्या गुणवत्तेचे या ज्या प्रमाणात ते पदार्थ खाणार आहेत त्याची चाचणी केलेली नाही.
३) ह्या चाचण्या ४ ते ५ सुदृढ स्वयंसेवकांवर केलेल्या आहेत, समाजातील विविध स्तरातील लोकांवर नाही जसे स्त्री/पुरुष, मधुमेहमुक्त/पूर्व-मधुमेही/मधुमेही, विविध वयोगट, वजनदार/जाडे इत्यादी आणि म्हणून येणारे निकाल हरेक व्यक्ती साठी वेगवेगळे असू शकतात.
४) जर एका व्यक्तीमध्ये ठराविक पदार्थामुळे इन्सुलिनचे स्त्रावण झाले तर आपण ठामपणे म्हणू शकतो की दुसऱ्या व्यक्तीमध्ये ते होईलच परंतु त्या उलट म्हणणे थोडे धाडसाचेच होईल… जर एखादया पदार्थामुळे इन्सुलिनचे स्त्रावण होत नाही असे ठामपणे म्हणायचे असेल तर दोन पर्याय आहेत:
एकतर ह्या चाचण्या समाजातील विविध स्तरांतील १८ ते २० स्वयंसेवकांवर कराव्या लागतील (ही तर फारच खर्चिक बाब आहे!) किंवा ज्या व्यक्तीला एखादा पदार्थ खाल्ल्याने इन्सुलिनचे स्त्रावण होते की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर त्याने ते स्वतःवर करावं ( हाच योग्य व सोप्पा मार्ग ठरेल!)

इन्सुलिन स्त्रावणाची चाचणी करण्यासाठी कृती:
१) आपल्याला ज्या पदार्थाबद्दल जाणून घ्यायचे आहे तो घेऊन १० ते १२ तासाच्या उपासानंतर लॅब मध्ये जा.
२) इन्सुलिन स्त्रावणाच्या चाचणी साठी रक्ताचा नमुना द्या… त्यावेळेचे नोंद ‘०’ मिनिट अशी करा.
३) आपण सोबत आणलेला पदार्थ खा किंवा प्या. नंतर ‘१०’ मिनिटानंतर दुसऱ्यांदा रक्ताचा नमुना द्या (या १० मिनिटांत तुम्ही आणलेला पदार्थ संपवा किंवा संपवला नाही तरी चालेल) 
४) ‘६०’ मिनिटानंतर तिसऱ्यांदा रक्ताचा नमुना द्या.
५) लॅब तंत्रज्ञाने ह्या तीनही नमुन्यांवर एक, दोन व तीन असे लेबल लावले आहे याची खात्री करून घ्या, गोंधळ नको म्हणून वेळ लिहिली तर उत्तम.
६) तिन्ही नमुन्यांचे वेग वेगळे रिपोर्ट्स द्यावेत याचा आग्रह धरा

वेगवेगळ्या पदार्थांमुळे होणाऱ्या इन्सुलिन स्त्रावणाचे जास्तीतजास्त पुरावे गोळा करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा

(मराठी भाषांतर: श्री अरुण नावगे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts