आजचा प्रश्न : सर, आम्ही आहार योजनांच्या पहिल्या दोन किंवा तीन महिन्यात काही किलो वजन गमावले. आता ते स्थिर आहे. काय करावे?

0

आजचा प्रश्न : सर, आम्ही आहार योजनांच्या पहिल्या दोन किंवा तीन महिन्यात काही किलो वजन गमावले. आता ते स्थिर आहे. काय करावे?

आजचा प्रश्न

प्रश्न: डॉक्टरसाहेब, आहार नियंत्रण योजनेचे पालन करणे सुरू केल्यावर आमचे वजन पहिल्या २-३ महिन्यात थोडे-फार उतरले पण आता स्थिरावले आहे. तर आम्ही पुढे काय करावे?

उत्तर: प्रिय सभासदहो, आमच्या संशोधनावरून असे दिसून आले आहे की सरासरीने पाहिल्यास सहा महिन्यात बहुतेकांचे वजन ६.८ किलो कमी होते व त्यात कमीत कमी ३ किलो तर जास्तीत जास्त १६ किलो असा पल्ला दिसून आला आहे.
असेही दिसून आले आहे कीं कांहीं लोकांचे वजन पहिल्या तीन महिन्यात जास्त उतरते तर कांहींचे पुढच्या तीन महिन्यात! पण प्रत्येकाचे वजन नक्कीच उतरते!
असेही दिसून आले आहे कीं सुरुवातीला लक्षणीय स्तरावर वजन उतरल्यावर पुढील वजन उतरण्याची गती कमी होते वा थांबते.
यावर कांहीं उपाय खाली दिले आहेत:
१) दुपारच्या जेवणातून एक चपाती कमी करा व त्या जागी अर्धी वाटी मोड़ आलेली कडधान्ये खा.
२) एकाच जेवणात भात व चपाती दोन्ही खाऊ नका. दुपारच्या जेवणात चपाती खा तर रात्रीच्या जेवणात भात खा.
३) आठवड्यात एकदा नेहमीचे जेवण न घेता त्या ऐवजी सूप किंवा फळे घ्या!
४) आठवड्यात एकदा नेहमीचे ४.५ किमी चालण्याऐवजी ६-८ किमी चाला.
वरील बदल केल्याने तुमचे वजन उतरविण्यात नक्की मदत होईल याची मला खात्री वाटते!
तुमच्या उंचीनुसार तुमचे वजन तुमच्या आरोग्यानुसार सुयोग्य पातळीपर्यंत उतरल्यावर त्यापुढे ते न उतरता स्थिर होईल हे सुद्धा लक्षात ठेवा.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts