यशोगाथा : दिपक मेहेंदळे (तारीख 2nd Aug 2025)
परिचय पत्र
नाव: दिपक मेहेंदळे
वय: ५९ वर्षे
उंची: १५७ सेंमी
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ९९६०४३७०४५
माझी परिवर्तन कथा
३१ जुलै २०२२ रोजी निवृत्त झाल्यानंतर हळू हळू वजन कमी होते आहे असे दिसले. ८४ कि. वरुन ७२ कि. झाले. मला वाटले काही विशेष कष्ट न करता जर वजन कमी होत असेल तर चांगलेच आहे. पण त्या बरोबर सारखी तहान लागत होती व वारंवार रात्री सुद्धा लघवी करण्यासाठी उठावे लागत होते.
माझी पत्नी अंजलीने मला शुगर चेक करण्याचा सल्ला दिला. पण मी तिला प्रथम नकार दिला. पण तिच्या आग्रहाने पण काहीशा अनिच्छेने मी २५ नोव्हेंबर २०२३ रोजी शुगर तपासून घेतली. आलेले रिपोर्ट अत्यंत धक्कादायक होते. माझे एचबीएवनसी १३% व एव्हरेज ग्लुकोज ३२६ होते. बहुधा निवृत्तीनंतर हालचाल व व्यायामाचा अभाव यामुळे जास्त प्रकर्षाने डायबेटिस झाला असावा असा माझा ग्रह झाला.
माझी पत्नी अंजली हिला डायबेटिस जवळजवळ गेल्या १२ ते १५ वर्षांपासून आहे. ती कोणत्याही गृपमध्ये सामील झाली नाही. पण नाशिक सेंटरमधील डॉ. आष्टेकरांच्या मदतीने पुण्याच्या DRC चा पत्ता शोधला. फोन केला असता अजून टेस्टची लिस्ट मिळाली व सर्व रिपोर्ट घेऊन यायला सांगितले.


मी ४ डिसेंबरला सर्व रिपोर्ट घेऊन सेंटरला आलो. डॉ. दीक्षित सोमवार असल्यामुळे मला भेटले व त्यांनी मला आश्वस्त केले की जर मी ही जीवनपद्धती व्यवस्थितपणे अंगिकारली तर मी लवकरच नॉन डायबेटिक होईन. मी सर्व समजावून घेतल्यानंतर ही जीवनपद्धती तंतोतंत पाळण्याचा निश्चय केला.
सुरुवातीला गोड खाणे एकदम बंध, तसेच गोड चहा घेणे एकदम बंद याची शरीराला व मुख्य म्हणजे मनाला सवय नसल्यामुळे खूप जड गेले. काही दिवस डोकेपण दुखत होते. पण त्यावर औषध घेऊन (५५ मिनिटात) या जीवनशैलीची सवय झाली.
सुरुवातीला चालण्याची सवय नव्हती. पायाला फोड पण आले. पण हळूहळू या सर्वांची सवय झाली. ४ महिन्यात एचबीएवनसी १३ वरुन ५.४% झाले, वजन ४ कि. कमी झाले आणि पोटाचा घेर पण ३.५ सें.मी. कमी झाला. अधिक फायदा म्हणजे माझा रक्त्तदाब कमी होऊन त्याची गोळी पण बंद झाली. मी मधुमेही ते पूर्व-मधुमेही झालो.
या सर्व प्रवासात माझी पत्नी सौ. अंजली हीची फार मोलाची साथ लाभली. आता माझी पत्नी देखील पुणे सेंटरला येते. तिची पण औषधे कमी झाली आहेत.
मी डॉ. दीक्षित सर, विश्वास जोशी सर, सौ. स्वाती मॅडम व सर्व टीमचा खूप आभारी आहे. ४ एप्रिल २०२४ ला सरांनी मला सर्व रिपोर्ट देवून आमच्या दोघांचा सत्कार केला. आम्ही दोघेही आयुष्यभर जीवनशैली चालू ठेवणार आहोत. इतरांनाही ही जीवनपद्धती अंगिकारण्याचा आग्रह करु व प्रोत्साहन देत राहू.
(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)