यशोगाथा : दिपक गोळे
नाव: दिपक गोळे
वय: ५२ वर्षे
उंची: १७६ सेंमी
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य: वारजे,पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ९३७२८५८८५७
माझी परिवर्तन कथा
मला गेल्या ५-६ वर्षांपासून डायबेटिस आहे. डॉक्टरांनी मला माझे रिपोर्ट पाहून मधुमेहाच्या गोळ्या सुरु केल्या. मी रोज सकाळी व रात्री अशा दोन वेळा गोळ्या घेत असे. मला गोळी बंद व्हावी अशी मनापासून इच्छा होती, पण मार्ग सापडत नव्हता.
परंतु एके दिवशी मी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहिला. व्हिडिओ ऐकल्यानंतर मला प्रत्यक्ष मार्गदर्शनाची गरज वाटली. मी जंगली महाराज रोडच्या सरांच्या सेंटरला भेट दिली. तिथे गेल्यावर प्रथम अश्विनी अटकेकर मॅडम, विश्वास सर व डॉ. दीक्षित सर यांनी मार्गदर्शन केले. त्या दिवशी माझे एचबीएवनसी ७.१% होते, वजन ८६ कि. होते. माझी उंची १७६ सें.मी. असल्यामुळे मला १० किलो वजन उतरवण्याचा सल्ला मिळाला.
मी या तारखेपासून प्रामाणिकपणे जीवनशैली आत्मसात केली. सेंटरमध्ये मला एका महिन्याने एचबीएवनसी करुन यायला सांगितले होते. त्याप्रमाणे मी तारखेला एचबीएवनसी करुन गेलो. टेस्ट रिझल्ट पाहून मला आनंद झाला. माझे एचबीएवनसी ६.३% व वजन ७८ कि. झाले होते. मी मधुमेही वरुन पूर्व मधुमेही झालो होतो. माझा उत्साह वाढला. परत एका महिन्याने मी टेस्ट करुन घेतली. आता तर मी आणखीन आनंदित झालो. माझे एचबीएवनसी ५.७% झाले व वजन ७३ कि. झाले. माझे वजन हे आता उंचीच्या प्रमाणात योग्य रितीने झाले होते.या जानेवारीत तर माझे वजन ६९ किलो झाले. सेंटरमधील डॉक्टरांनी माझ्या गोळ्या बंद केल्या. या गोळ्या फक्त्त जीवनशैलीमुळेच बंद झाल्या.
प्रेरणादायी मार्गदर्शन आणि आरोग्याविषयी ज्ञान दिल्याबद्दल मी माझ्या सर्व प्रशासकांचे विशेषतः अश्विनी अटकेकर मॅडम, विश्वास जोशी सर आणि डॉ दीक्षित सर व संपूर्ण DRC गृप यांचे मनापासून आभार मानू इच्छितो. सर्वजण नेहमी कॉलवर उपलब्ध असायचे. वारंवार मेसेजची देवाणघेवाण करायचो. माझ्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणल्याबद्दल मी डॉ दीक्षित सरांचे परत एकदा आभार मानतोव ही जीवनशैली मी जन्मभर पाळून मधुमेह मुक्त्त राहीन याची ग्वाही देतो.
(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

