यशोगाथा : स्नेहलता मेणसे

0

यशोगाथा : स्नेहलता मेणसे

परिचय पत्र

नाव: स्नेहलता मेणसे
वय: ६५ वर्षे
उंची: १५४ सेंमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ९८६०५२८९२९

माझी परिवर्तन कथा

माझ्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये वडिलांना, काकांना मधुमेह आहे म्हणून मी दर सहा महिन्यांनी शुगर चेक करत असे. ५-६ वर्षांपूर्वी मला रक्त्तात थोडी शुगर आली होती. पण जेवणातील बदलातून मी बऱ्यापैकी नियंत्रणात आणली तरी दर वर्षातून दोनदा मी टेस्ट करण्याचा प्रघात सुरु ठेवला. जून २०२२ ला शुगर चेक केली असता माझे एचबीएवनसी ६.९% आले. आमच्या फॅमिली डॉक्टरांनी ५०० mg. ची गोळी सुरु केली.
मी डॉ. दीक्षित सरांबद्दल ऐकून होते. मी १४ डिसेंबर २०२२ ला सेंटरवर आले. तिथे मला डॉ दीक्षित जीवनशैलीबद्दल सर्व माहिती दिली. जेवणाची पद्धत कशी असावी व जेवतांना काय काय खावे याबद्दल सविस्तर चर्चा झाली. मी सर्व ऐकून ही जीवनपद्धती आत्मसात करायचा निर्णय घेतला. १४ डिसेंबर मध्ये माझे एचबीएवनसी ७.१% व उपाशीपोटी इन्सुलिन ११ होते. मला एका महिन्यानी एचबीएवनसी करुन यायला सांगितले. फेब्रुवारी २०२३ ला माझी सेंटरच्या डॉक्टरांनी मेटफॉर्मिंग ५०० mg.ची एका गोळीची अर्धी गोळी केली. मला खूप आशादायी वाटले. नंतर जुलै २०२३ पासून सर्वच औषध बंद केली.
गोळी बंद केल्यावरही माझे एचबीएवनसी हळूहळू उतरत होते. २०२४ च्या मे मध्ये तर ते ६.४% आले. मी एका वर्षात मधुमेहीहून पूर्व मधुमेही झाले. वजनही ५ किलोने उतरले. माझा उत्साह वाढला व डॉ. दीक्षित जीवनशैली आयुष्यभर चालू ठेवण्याचा निश्चय केला. आणि त्याप्रमाणे मी करत आहे.
डॉ. जगन्नाथ दीक्षित सर व त्यांच्या टीमने मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. मी सर्वांना धन्यवाद देते आणि आज मी पूर्णतः समाधानी आहे.

 

(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts