यशोगाथा : आनंद आसोपा
नाव: आनंद आसोपा
वय: ४२ वर्षे
उंची: १७६ सेंमी
व्यवसाय: पौरोहित्य
वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ८८३०३१११३८
माझी परिवर्तन कथा
मी आनंद आसोपा पुणे येथे पौरोहित्य करत आहे. माझ्या कामाच्या परिस्थितीनुसार माझा आहार अनियंत्रित होता. जेवणाच्या वेळेत सुद्धा खूप अनियमितता होती. त्याचा होता होता तोच परिणाम झाला. माझे वजन ९६.२५ किलो झाले. रक्त्ताची तपासणी करता असे कळाले की माझे एचबीएवनसी ६.८% झाले व मी वयाच्या ४१ व्या वर्षी मधुमेही झालो. आता मात्र मी माझी तब्येत सुधारण्याचा निर्णय घेतला व डॉ. दीक्षित जीवनशैली आत्मसात करावी याचा निर्णय मनोमन घेतला व तोच माझ्या आयुष्यातील क्रांतिकारक क्षण ठरला.
मी पुणे येथील D R C ला भेट दिली. तिथे मला शिल्पा मॅडम व जोशी सरांनी उत्तम मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितलेली जीवनशैली मी तंतोतंत पाळली. दर महिन्याला सेंटरच्या भेटीत मला सर्वांचा खूप चांगला सहयोग मिळाला.
या आहारपद्धतीमुळे माझ्या आरोग्यात सकारात्मक बदल झाला. माझ्या खाण्याच्या दोन्ही वेळेत नियमता आली. मला कामाच्या ठिकाणी जेवणाचा, देवाचा प्रसाद खाण्याचा खूप आग्रह होतो. पण मी त्यांना नम्रतापूर्वक नकार देतो. याचाच परिणाम म्हणजे मी औषध न घेता मधुमेहीतून पूर्व मधुमेही पर्यंतचा पल्ला केवळ ४ महिन्यात गाठला. वजनही ११ कि. ने कमी झाले. मला मधुमेहाची औषधे घ्यावी लागली नाही म्हणून मी देवाचा आभारी आहे.
डॉ दीक्षित जीवनशैलीमुळे माझ्या जीवनपद्धतीत आमूलाग्र बदल झाला. त्यांच्या टीमचा स्थायी आभारी झालो. मी यापुढे ही जीवनपद्धतीचे तंतोतंत पालन करुन मधुमेह मुक्त्त होण्याचा कसोशीने प्रयत्न करीन. या प्रवासात साथ देणाऱ्या डॉ. दीक्षित सर व त्यांच्या टीमचा मी खूप खूप आभारी आहे.
(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

