यशोगाथा : शिरीष कवठकर
परिचय पत्र
नाव: शिरीष कवठकर
वय: ४४ वर्षे
उंची: १७९ सेंमी
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ९८९०१९३२१६
माझी परिवर्तन कथा
गेल्या १५ वर्षांपासून मी I. T. च्या दुनियेत मग्न आहे. अनेकदा जंकफूडच्या सुविधेसह मी माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले. तथापि २३ जून २०२३ हा माझ्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरला. त्यावेळी मला डोळ्यांच्या समस्यांचा सामना करावा लागला. आणि मला टाईप ए च्या मधुमेहाचे निदान झाले. माझी एचबीएवनसी च्या पातळीने ९.८% एवढा आकडा गाठला होता. मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असूनही आजपर्यंत मला आरोग्य विषयक कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागला नव्हता. पण आज मात्र समस्या पुढे येऊन उभी राहिली. आणि हीच वेळ मला पुण्यातील सल्लागार केंद्रापर्यंत येण्याची ठरली.
तिथे मी अमूल्य माहिती आत्मसात केली. स्वतः डॉ. दीक्षित सर यांना भेटण्याचा योग आला. डॉ. दीक्षित यांच्या परिवर्तनशील जीवनशैलीच्या दृष्टिकोनाविषयी जाणून घेतल्यावर, मी ते मनापासून स्वीकारले. केंद्रातील डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मुधमेहावरील औषधे त्वरित सुरु न करण्याचा निर्णय घेतला. पुढील ३ महिन्यात मी वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेहासाठी नविन मार्गाचा अनुभव घेत, सरांच्या टीमने दिलेल्या आहाराच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले. भविष्यात वजन कमी करण्याबाबत, आरोग्य सुधारणा होण्याबद्दल माझा आशावाद वाढला होता. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मी माझ्यात झालेला उल्लेखनीय बदल अनुभवत होतो.
DRC पुणे येथील स्वयंसेवक आणि डॉक्टर्स, विशेषतः डॉ. दीक्षित यांच्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल आणि या प्रवासात माझ्या पत्नीच्या अविचल काळजी आणि पाठिंब्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या व्यतिरिक्त्त माझ्या आरोग्याच्या प्रयत्नात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मी ॲडोर ट्रस्टचा आभारी आहे.
(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

