यशोगाथा : Sonal Mule

0

यशोगाथा : Sonal Mule

परिचय पत्र

नाव: सोनल मुळे
वय: २८ वर्षे
उंची: १५९.३ सेंमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: चिंचवड, पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ९९२३८६८१५८

माझी परिवर्तन कथा

माझे २०२० साली प्रेग्नन्सीमध्ये टेस्ट केली असता एचबीएवनसी ६.८% आले व मी डायबेटिक असल्याचे कळले. माझ्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांनी हे प्रेग्नन्सीमुळे आहे. पुढे कमी होईल असे सांगितले. त्यामुळे मी जरा गाफील राहिले. परंतु डिसेंबर २०२२ ला एचबीएवनसी केल्यानंतर माझे रिडिंग ७.३% आले. तेव्हा माझ्या स्त्रीरोग तज्ञाने मला डॉ. दीक्षित जीवनशैली बद्दल सांगितले.
मी D R C पुणे येथे आले. तेथे मला डॉ दीक्षित जीवनशैलीबद्दल सर्व माहिती दिली व औषधे न घेता तुम्ही मधुमेह मुक्त्त होऊ शकाल याची खात्री दिली.
मी ही जीवनशैली पाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मला त्यात यश आले. ११ महिन्यात माझे एचबीएवनसी ७.३ पासून ५.८३% पर्यंत आले. या काळात मी डायबेटिसची कोणतीही औषधे घेत नव्हते. या काळात माझ्या नवऱ्याची खूप साथ मिळाली.
मी डॉ. दीक्षित सर व सेंटरमधील त्यांचे सर्व सहकारी यांची खूप आभारी आहे. ही जीवनशैली जन्मभर पाळण्याचा मी कसोशीने प्रयत्न करणार आहे.

 

(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts