यशोगाथा : तारीख 18 July 2025

0

यशोगाथा : तारीख 18 July 2025

नाव: सुरेखा नवलाखा
वय: ६३ वर्षे
उंची: १५१ सेंमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ९८८१९९९२२४

माझी परिवर्तन कथा

माझे मिस्टर ललित नवलाखा हे बरेच दिवसांपासून डायबेटिक होते. ते नियमितपणे सेंटरला येत होते व त्यांना त्याचा फायदा पण होत होता. ते मला टेस्ट करुन घेण्याबाबत खूप आग्रही होते. शेवटी त्यांच्याच आग्रहामुळे मी २२.०५.२०२३ ला एचबीएवनसी टेस्ट केली. खरंतर त्यावेळी मला कोणताही त्रास नव्हता.
दुसऱ्या दिवशी टेस्ट रिझल्ट आले. माझे एचबीएवनसी ६.९% आले. मला कोणतेही लक्षण व त्रास नसतांना डायबेटिस कसा झाला याचे आश्चर्य वाटले व धक्का पण बसला. लगेचच मी जंगली महाराज रोडवरच्या सेंटरवर आले. तेथे मला शिल्पा मॅडमने डॉ दीक्षित जीवनशैली सविस्तरपणे सांगितली. औषध घेत नसल्यामुळे मी लवकरच डायबेटिस मुक्त्त होईन असे सांगून आश्वस्त केले.
माझ्या पतीमुळे मी घरात या जीवनपद्धतीबद्दल अवगत होतेच. पण उरल्यासुरल्या शंकेचेही निरसन झाले व लगेच दुसऱ्या दिवसापासून या जीवनपद्धतीचे काटेकोरपणे पालन सुरु केले. त्यावेळी माझे वजन खूप जास्त म्हणजे ८३ कि. होते. माझे पाय पण दुखत होते.
पण याचा विचार न करता मी सर्व नियमितपणे खाणे व चालणे सुरु ठेवले. तीन महिन्यातच माझे वजन ७ कि. ने कमी झाले व एचबीएवनसी ६.९ वरुन ६.२% वर आले. उपाशीपोटी इन्सुलिनसुद्धा १० च्या आत आले. माझा उत्साह वाढला. मला हलके वाटू लागले. दिवसभर काम करुनही मी दमत नव्हते. हा फार मोठा सकारात्मक बदल होता. तीन महिन्यातच मी डायबेटिकमधुमेही ते पूर्व-मधुमेही प्रवास केला. मार्च २०२४ ला तर माझे एचबीएवनसी ६.० आले. आता माझे वजनही ११.३ किलोने उतरले होते.
माझ्या मिस्टरांनाही या जीवनशैलीचा खूप फायदा झाला. त्यांचे वजन १७ किलोने कमी झाले. त्यांची डायबेटीसची औषधे पण खूप कमी झाली. आज आमच्या घरात सर्वजण खूप समाधानी व आनंदी आहेत.
डॉ. दीक्षित सर, शिल्पा मॅडम, डॉ. स्वाती मॅडम व बाकी सर्व टीमचे मी खूप मनापासून आभार मानते. आम्ही दोघेही जन्मभर ही जीवनशैली पाळून मधुमेह मुक्त्त होऊन व तसेच ते टिकवून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणार आहे.

 

(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

Your email address will not be published.

Related Posts