यशोगाथा : तारीख 17 July 2025
नाव: श्यामकांत जोशी
वय: ६० वर्षे
उंची: १६७ सेंमी
व्यवसाय: निवृत्त
वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ८६००१०८११०
माझी परिवर्तन कथा
मला २१.०३.२०२३ ला कळले की डॉ. दीक्षित सरांच्या सेंटरमध्ये मोफत एचबीएवनसी ची मोहिम चालू आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी मी DRC पुणे येथे गेलो व टेस्ट करुन घेतली. त्यावेळी माझे एचबीएवनसी ९.३% आले व मी मधुमेही घोषित झालो. मी २०२२ पासून डॉ. दीक्षित यांच्याबद्दल ऐकून होतो. आता त्यांचा सल्ला घेण्याचा विचार केला व DRC मध्ये जाऊन दिक्षित सरांच्या जीवनशैलीबद्दल सर्व जाणून घेतले.
मग मी ४/५ कि.मी. चालणे व फक्त्त दोन वेळा जेवणे या जीवनशैलीचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे अनुसरण चालू केले. याचा फायदा मला दर महिन्याच्या टेस्ट रिझल्टवरुन कळायला लागला. ८ महिन्यात माझे एचबीएवनसी ९.३ वरुन ५.८% वर आले. माझे वजनही ४.४ कि. कमी झाले.
आगामी काळात डॉ दीक्षित जीवनशैली जीवनात अवलंबून आणखी यश पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी लवकरच मधुमेहमुक्त्त होईन याची मला आशा आहे.
माझी यशोगाथा घडवण्यात नेहमी मदत करणाऱ्या डॉ. दीक्षित सर व त्यांची टीम – गोखले सर, जोशी सर, शिल्पा मॅडम अगदी कैलास सुद्धा – यांच्या सल्ल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.
(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

