यशोगाथा 13: तारीख: 16 मार्च 2022

0

यशोगाथा 13: तारीख: 16 मार्च 2022

परिचय पत्र

नाव: विठ्ठल चव्हाण
वय: ६५ वर्ष
उंची: १६४ सेमी
व्यवसाय: सेवानिवृत शिक्षक
वास्तव्य: सावरगाव जिल्हा अहमदनगर
समूह: EWL DM LMP Group
मोबाइल: ९७३०६३९२१३

माझी परिवर्तन कथा

मला आषाढी एकादशीच्या दिवशी चक्कर आली त्यामुळे मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी सांगितले की तुमची शुगर वाढली आहे . त्याआधी मला कसलाही त्रास नव्हता. नंतर मी माझ्या मुलीकडे पुण्याला गेलो. तिथे टीव्हीवर *डॉ दीक्षित* सरांचे व्याख्यान पाहिले. नंतर त्यांची युट्यूब वरील सर्व व्याख्याने ऐकली. दररोज फिरायला जाताना त्यांचे व्याख्यान ऐकत असे. त्यातूनच मला दीपक कुलकर्णी सरांचा नंबर मिळाला. त्यावेळी माझे एचबीएवनसी ६.४% होते. मी माझे रिपोर्ट कुलकर्णी सरांकडे पाठवले. त्यांनी मला समुहात प्रविष्ट करून घेतले. मी लगेचच डाएट प्लॅन सुरू केला परंतु कोरोना मुळे २ वर्ष रक्तशर्करा चेक केली नाही. ५/१०/२१ रोजी एचबीएवनसी चेक केली ती १०.७% झाली अर्थात मी गंभीर मधुमेही झालो होतो तयामुळे कुलकर्णी सरांनी त्यांनी मला डॉ. रत्ना आष्टेकर मॅडम चा नंबर दिला .
डॉ. रत्ना आष्टेकर मॅडम ने सर्व डाएट प्लॅन व किती खावे, काय खावे हे समजावून सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व डाएटचे काटेकोर पणे पालन केले. मी एक ग्लुकोमिटर सुद्धा खरेदी केले.

माझी जेवणाची वेळ सकाळी १०:३० आणि संध्याकाळी ७:३० आहे. सॅलड, काजू, बदाम, अक्रोड, प्रोटीनसाठी मोड आलेले कडधान्य, हरभरे, मटकी, हे सगळं एक वाटी खातो. कधी कधी दोन उकडलेली अंडी खातो, कधी चिकन खातो. सकाळी दोन चपाती आणि संध्याकाळी १ भाकर खातो. दररोज पाच किलोमीटर चालतो. मी दिवसातून दोनच वेळा जेवतो व गोड फळे बिलकुल खात नाही. डॉ रत्ना आष्टेकर मॅडमच्या मागदर्शनाखाली मी डाएट प्लॅन सांभाळत आहे.
१०/११/२१ रोजी एचबीएवनसी ८.७ झाले. मी रिपोर्ट डॉ. रत्ना मॅडम कडे पाठवले. तीन महिन्यांनंतर २१/२/२२ रोजी एचबीएवनसी ५.८० आले. अशाप्रकारे डॉ. रत्ना मॅडम च्या मार्गद्शनाखाली माझी रक्तशर्करा कमी झाली.
मी *डॉ. दीक्षित सर*, मा. दीपक कुलकर्णी सर, डॉ रत्ना आष्टेकर मॅडम या सर्वांचा खुप खुप आभारी आहे. मी या जीवनशैलीचा आयुष्य भर स्वीकार करणार आहे.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts