यशोगाथा 12: दिनांक 21 मार्च

0

यशोगाथा 12: दिनांक 21 मार्च

परिचय पत्र

नाव: प्रसांत चंद्रा
वय: ६५ वर्ष
उंची: १६७ सेंमी
वास्तव्य: कोलकाता
व्यवसाय: सेवानिवृत्त अभियंता
मोबाइल: ९८३११७५२७५

माझी परिवर्तन कथा

१० नोवेंबर २०२० ला मधुमेही घोषित झाल्यावर मी कोलकात्यातील डॉक्टरांकडे गेलो ज्यांनी मला औषधं घ्यायला सांगितली. पण मी माझ्या मधुमेही वडीलांना या आजाराचा त्रास सोसताना पाहिले होते म्हणून मला काळजी वाटत होती.
सप्टेंबर २०२१ मध्ये मला माझे शेजारी दासगुप्ता यांच्याकडून *डॉ दीक्षित* यांचेबद्दल माहिती मिळाली. त्यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये या जीवनशैलीची सुरुवात केली होते. मी *डॉ दीक्षित* यांची भाषणे ऐकली आणि त्यांचे लिहिलेले पुस्तक सुद्धा विकत घेवून वाचले. मी माझ्या रक्त परीक्षणांचे अहवाल *डॉ दीक्षित* यांना पाठवले. त्या पाहून त्यांनी मला औषधे थांबवायला आणि त्यांच्या जीवनशैली बद्दल सविस्तर सांगितले. त्यानुसार

मी १ ऑक्टोबर २०२१ पासून या जीवनशैलीचे पालन सुरु केले. मी सकाळी ९:३० आणि संध्याकाळी ७ वाजता जेवतो व सकाळी ७ आणि संध्याकाळी ५ वाजता ब्लॅक टी घेतो. मी गोड खाणे पूर्णपणे थांबवले आणि आहारातून कर्बोदके कमी केली. माझी सकाळची न्याहारी म्हणजे थोडेसे बदाम, अक्रोड, सलाद, दोन अंडी, दोन चपात्या, भाजी, आणि दही खातो.

रात्रीच्या जेवणात काही सुके मेवे, सलाड, चिकन/मासे, एक चपाती आणि भाजी खातो. मी आधीही अनेक वर्षे सकाळी ४५-५० मिनिटे चालायचो पण तेव्हा माझी गती ताशी ५ किमी असायची. *डॉ दीक्षितांच्या* सांगण्यावरून मी माझी गती वाढवत आता ताशी ६.५ किमी इतकी वाढवली आहे.
*डॉ दीक्षित* जीवनशैली चे दोन महिने पालन केल्यावर माझे एचबीएवनसी औषधाविना ५.७% झाले. त्यानंतर तीन महिन्यांनी तर ते ५.६% झाले आणि उपाशीपोतीइन्सुलिन ११.८ वरून ७.८ IU/ml झाली अर्थात मी मधुमेह-मुक्त झालो. त्यासोबत माझे ५ किलो वजन आणि थायरॉइड ची औषधे देखील कमी झाली.
मी हे मान्य करायलाच हवं कि *डॉ दीक्षित* यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या जीवनशैलीमुळे मला खूपच फायदा झाला . मी आता आयुष्यभर या जीवनशैलीचे पालन करणार आहे. तसेच मी माझ्या मित्राना आणि नातेवाईकांना ही याबद्दल सांगणार आहे.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts