यशोगाथा 10: तारीख: 27 मार्च 2022
परिचय पत्र
नाव: अनिल आर पवार
वय: ३९ वर्षे
उंची: १६२.६ सेंमी
व्यवसाय: खाजगी नोकरी
वास्तव्य: धारवाड, कर्नाटक
गट: ०१ डी एम रिव्ह
मोबाईल: ९९८७०९०८११
माझी परिवर्तन कथा
माझ्या कार्यालयातील सहकाऱ्यांपैकी एक श्री शैलेश मधुमेहाने त्रस्त होते. माझ्या रक्तातील साखरेच्या पातळीबद्दल त्यांनी मला विचारलेल्या प्रश्नाने मी दि ५-७-२०२१ रोजी माझे रक्त तपासले.जीओडी -पीओडी पद्धती क पद्धतीने रक्तातील साखरेची पातळी २५५ होती ज्यामुळे मला धक्का बसला.
माझ्या अनेक मित्रांनी मला मधुमेहासाठी औषधे सुरू करण्याचा सल्ला दिला पण मी त्या मताचा नव्हतो. माझे मित्र श्री शैलेश यांनी मला *डॉ दीक्षित* आहार योजनेवरील यूट्यूब वरील संभाषण पाहण्यासाठी चलचित्राची लिंक पाठविली. मी ते चलचित्र पाहिले आणि *डॉ दीक्षित* आहार योजनेचं पालन करण्याचा निर्णय घेतला.
मी युट्युब संभाषणावरून श्री.अरुण नावगे सरांचा संपर्क क्रमांक मिळवला आणि त्यांना फोन केला. त्यांनी काही रक्त तपासण्या करण्यास सुचविले आणि माहिती डॉ नंदकुमार हाडगेवार यांना सांगण्याची सूचना केली. डॉ नंदकुमार यांनी मला आहार योजना समजावून सांगितली आणि मला आहार योजनेचे पालन करण्यासाठी दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन केले.
त्यानी मला एचबीएवनसी (एच पी एल सी पद्धत), उपाशीपोटी इन्सुलिन आणि पोटाचा घेर यांचे निरीक्षण नोंद करण्यास सांगितले.
मी १८/०७/२०२१ पासून *डॉ दीक्षित* आहार योजनेचे पालन करायला सुरुवात केली. मी दररोज एक तास चालण्याचे (२०-मिनिट जलद चालणे आणि ४० मिनिटे धावणे) आणि दिवसातून दोनदा जेवण घेण्याचे ठरवले. मी फक्त ३ महिने याचे पालन केले आणि आता निकालाने मला आश्चर्यचकित केले आहे. मी २-३ प्रसंग वगळता आहार योजनेचे काटेकोरपणे पालन केले.
मी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची वेळ निश्चित केली आहे. दुपारी १२.३० ते १.३० दरम्यान दुपारचे जेवण आणि रात्री ८.३० वाजता रात्रीचे जेवण घेतो. मी भात सोडून बहुतेक वेळा घरी शिजवलेले शाकाहारी पदार्थ घेतो. मी अंडी कधीकधी मांसाहारी पदार्थ म्हणून घेतो.
या *डॉ दीक्षित* आहार योजनेने मला मधुमेहपूर्व व्यक्ती बनवले तेही नैसर्गिकरित्या आणि औषधाविना.
मी *डॉ दीक्षित सर*, श्री. अरुण नावगे सर, डॉ. नंदकुमार सर आणि संपूर्ण टीमचा आभारी आहे जे आपल्या समाजासाठी इतके मोठे कार्य करत आहेत.
*डॉ दीक्षित* आहार योजनेबद्दल माझ्या मित्रांना आणि नातेवाईकांना माहिती देऊन या सामाजिक कार्यात मी माझे योगदान नक्कीच देईन.
मी त्यांना हा संदेश गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यास सांगेन.