यशोगाथा 9: तारीख: 28 मार्च 2022

0

यशोगाथा 9: तारीख: 28 मार्च 2022

परिचय पत्र

नाव: प्रीति वेदान्त
वय: ६२ वर्षे
उंची: १५७ सेमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: ठाणे, महाराष्ट्र
समूह: EWL Doctor’s DM-01
मोबाईल: ९९३०५८८९३०

माझी परिवर्तन कथा

माझे नाव प्रीती वेदांत आहे. २०१९ साली माझे वजन वाढत-वाढत ७४ किलो पर्यंत जावून पोहोचले . याची मला थोडी काळजी वाटायला लागली आणि मी स्वतःच *डॉ. दीक्षित जीवनशैली* अंगीकारिली.
१० महिन्यांतच माझे वजन ६८ किलो पर्यंत कमी झाले.
नोव्हेंबर २०२० मध्ये मला अचानक थकवा आणि अशक्तपणा वाटायला लागला. त्यातच निद्रानाशाचा विकार ही बळावला. माझ्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असल्याने मी लगेच एचबीएवनसी आणि उपाशी पोटी इन्सुलिनची चाचणी केली. माझे एचबीएवनसी १३.८ निघाले जे काळजी करण्यासारखे होते.
मग मी माझे चाचणी अहवाल श्री दिनकर दामले यांना पाठवले. त्यांनी मला डॉ. वेदा नलावडे यांना संपर्क करायला सांगितले. डॉ. नलावडे यांनी माझे अहवाल बघून काही इतर चाचण्या करावयास सांगितल्या. पण त्यांचे अहवाल चांगले निघाले.
डॉ. वेदा यांनी माझ्या आहारात काही बदल केला. मी *डॉ. दीक्षित जीवनशैली* चे पालन करणे चालू ठेवले.
माझ्या जेवणाच्या वेळा सकाळी १०.३० आणि संध्याकाळी ७.३० अश्या आहेत. दोन वेळेच्या जेवणव्यतिरिक्त मी फक्त पाणी आणि काळा चहा घेते.

मी दररोज ४५ मिनटे डॉ. रत्ना अष्टेकर आणि त्यांचे सहकारी यांनी दाखवलेला व्यायामाचा व्हीडीयो लावून त्याबरोबर न चुकता व्यायाम करते.
आता माझे एचबीएवनसी ७.१ पर्यंत खाली आले आहे. माझे वजन देखील ६३ किलो झाले आहे.
आता मला खूपच ताजेतवाने आणि उत्साही वाटते.
माझ्यामध्ये झालेल्या अनेक सकारात्मक बदलांमुळे माझी बहीण, मेव्हणे आणि भाची यांनी देखील *डॉ. दीक्षित जीवनशैली* अंगीकारिली आहे.
मी *डॉ. दीक्षित सर* आणि त्यांच्या संपूर्ण टीम चे खूप आभार मानते. हे सर्व लोक या पवित्र कामाकरिता निस्वार्थ भावनेने काम करतात. टीम मधील सगळेच सदस्य लोकांच्या समस्यांची लगेच दाखल घेऊन समाधान करतात.
तुम्हां सर्वांना खूप खूप धन्यवाद!

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts