यशोगाथा 8: दिनांक 31 मार्च
परिचय पत्र
नाव: समरसेन मोरे
वय: ३७ वर्ष
उंची: १७० सेंमी
वास्तव्य: कोल्हापूर
व्यवसाय: आयटी अभियंता
मोबाईल – ८३९०६३७१००
माझी परिवर्तन कथा
नोव्हेंबर २०२१ मध्ये मला मधुमेहाची सर्व लक्षणे आढळून आली. मी माझ्या फॅमिली डॉक्टरांना भेटलो. त्यांनी मला मधुमेहाची फॅमिली हिस्टरी असल्यामुळे मधुमेहाच्या तपासण्या करावयास सांगितले. १८ नोव्हेंबर २०२१ ला मी मधुमेही असल्याचे निदर्शनास आले. माझे एचबीएवनसी ११.८% होते . डॉक्टरांनी मधुमेहाचे औषधे सुरू करणे गरजेचे आहे असे सांगितले. सुरुवातीला मी एकदम घाबरून गेलो कारण इतक्या कमी वयामध्ये मधुमेह होतो हे पटेना. दरम्यान मी यूट्यूब वर *डॉक्टर दीक्षित* तसेच डॉक्टर जिचकर यांचे भाषण ऐकले. त्या माध्यमातून मला डॉक्टर नंदकुमार हाडगेकर सरांची भेट झाली. त्यांनी माझे रिपोर्ट पाहून आणखी काही टेस्ट करावयास सांगितले. आणि त्यानंतर मला *डॉ दीक्षित जीवनशैली* बद्दल पूर्ण माहिती दिली. मी पण औषधे खाण्यापेक्षा जीवनशैली बदल करणे यास प्राधान्य दिले . मी डिसेंबर २०२१ पासून *डॉ दीक्षित जीवनशैली* आत्मसात करण्यास सुरुवात केली.
मी सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ८ वाजता जेवतो व संध्याकाळी ५ वाजता ग्रीन टी घेतो. मी गोड खाणे पूर्णपणे थांबवले आणि आहारातून कर्बोदके कमी केली. मी माझी सकाळच्या जेवणात २-३ बदाम, अक्रोड, भाजलेले शेंगदाणे, काजू, सलाद, दोन अंडी/अंकुरित कडधान्य, दोन चपात्या, भाजी किंवा चिकन /मासे/मटन खातो. रात्रीच्या जेवणात फक्त चपाती ऐवजी भाकरी घेतो. मी रोज सकाळी नियमित जॉगिंग करण्यास सुरुवात केली. रोजचे माझे ६.५ किमी जॉगिंग, १५ मिनिटे स्ट्रेचिंग असा व्यायाम आहे. दीक्षित जीवनशैली सुरुवात केल्यापासून माझे वजन १० किलो कमी झाले आहे तसेच सध्याचं माझे एचबीएवनसी ५.५% इतके कमी झाले आहे . हे सर्व मी कोणतेही औषध न घेता प्राप्त केले आहे. तसेच माझे थायरॉईडच्या औषधांची मात्रा सुद्धा कमी झाली आहे.
आता मी ही जीवनशैली आयुष्यभर पाळण्याचा निर्धार केला आहे तसेच मी माझ्या मित्रांना आणि नातेवाईकांना सुद्धा याबद्दल माहिती देणार आहे. मी *डॉक्टर दीक्षित* तसेच डॉक्टर नंदकुमार हाडगेकर सरांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या जीवनशैली जोपासण्यासाठी प्रवृत्त केले. तसेच मी माझ्या पत्नी आणि आईचे आभार मानतो त्यांनी माझे पथ्य पाळण्यात पूर्णपणे साथ दिली.