यशोगाथा 7: तारीख: 1 एप्रिल 2022

0

यशोगाथा 7: तारीख: 1 एप्रिल 2022

परिचय पत्र

नाव: वैशाली दिनकर कडू
वय: ३४ वर्षे
उंची: १५२ सेंमी
व्यवसाय: बँकेत नोकरी
वास्तव्य: वाकड, पुणे
गट: डॉ.दीक्षित डाएट- प्रीडायबेटीस’ टेलिग्राम ग्रुप
मोबाईल नंबर: ८८८८६६७५४४

माझी परिवर्तन कथा

मला खाण्याची खूप आवड असल्याने माझ्यासमोर जे खाद्यपदार्थ येतील ते मी फस्त करीत असे आणि त्यामुळे दिवसागणिक माझे वजन वाढत होते. मला हे कळत होते पण वळत नव्हते. मी एखाद्या आहार योजनेचे पालन करण्यास सुरूवात करीत असे पण एकदोन दिवसातच पुन्हा पहिल्याप्रमाणे खाणे सुरू करीत असे. खाण्यास नकार देणे मला जमत नसल्याने आहार योजनेचे पालन करणे व नोकरी करणे मला शक्य होत नव्हते. वजन कमी करणे ही माझ्या दृष्टीने अशक्यप्राय गोष्ट होती.

माझी एक काकू *डॉ दीक्षित* यांच्या मधुमेहींसाठी असलेल्या आहार योजनेचे पालन करीत होती. दोन महिन्यातच तिचे वजन २ ते ४ किलोने कमी झाल्याचे तिच्याकडून समजले. तिचे वजन कमी झाले तर मी देखील वजन कमी करू शकेन, असा मी विचार केला.

मग मी यूट्यूब वर रोज रात्री पहाटे दोन वाजेपर्यंत *डॉ दीक्षित* सरांची व्याख्याने ऐकली. तसेच मी फेसबुक वरील “विनासायास वेट लॉस “गटात सामील झाले. फेसबुक वरील गटात मी लोकांच्या यशोगाथा वाचण्यास सुरुवात केली. त्या गटामधून मला डॉ सुहासिनी भालेराव मॅडम ह्यांचा मोबाईल नंबर मिळाला. मी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सल्ल्यानुसार सर्वप्रथम मी
एचबीएवनसी आणि उपाशीपोटी इन्सुलिन ह्या रक्त चाचण्या करून घेतल्या. त्यांनी माझे समुपदेशन केले आणि आहार योजनेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी मला “डॉ दीक्षित डाएट: प्रीडायबेटीस’ टेलिग्राम ग्रुप” ह्या गटात सामील करून घेतले. माझ्या रक्तचाचण्यांचे निष्कर्ष सोबतच्या तक्त्यात दिले आहेत.

दि. २०.०९.२०२१ पासून मी *डॉ दीक्षित आहार योजनेचे* पालन करण्यास सुरूवात केली. प्रारंभी इतका त्रास व्हायचा की एक किमी चालणेही मला शक्य होत नव्हते. पूर्वी मी सकाळी चहा आणि नाश्ता घेत असल्याने सुरुवातीला मला डोकेदुखीचा त्रास होत असे. त्यामुळे पहिले ८-१० दिवस आहार योजनेचे मी पालन नीट करू शकले नाही. त्यानंतर मात्र मी आहार आणि व्यायाम नियमित पणे करू लागले आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणजे माझे वजन कमी होऊ लागले.

मी पहिले जेवण १२ वाजता आणि दुसरे जेवण रात्री ८.०० वाजता घेते. पूर्वी दोन जेवणांच्या मध्ये मीठ घातलेले पातळ ताक पीत असे. मात्र काही दिवसानंतर फक्त पाणी पिण्यास सुरुवात केली.

*डॉ दीक्षित आहार योजनेचे* काटेकोरपणे आणि नियमितपणे पालन करण्यासाठी डॉ भालेराव मॅडम ह्यांनी मला प्रोत्साहन दिले. टेलिग्राम गटावर येणाऱ्या यशोगाथा मी नेहमीच वाचत असे. गटामधील बहुतेक सदस्य नियमितपणे व्यायाम करीत असत आणि स्वतः हाती घेतलेल्या कार्याबद्दल सर्वांना अवगत करीत असत. त्यामुळे मलाही आहार योजनेचे पालन सातत्याने करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असे.

२०.०९.२०२१ ते २०.१२.२०२१ ह्या तीन महिन्यांच्या कालावधीत माझे ४ किलो वजन कमी झाले. आणि त्यापुढील तीन महिन्यात ३ किलो असे एकूण ७ किलो वजन कमी झाले! माझे एचबीएवनसी ५.६ वरून ५.१ आणि उपाशीपोटी इन्सुलिन ११.६ वरून ५.१ इतके कमी झाले. म्हणजे मी पूर्व मधुमेही वर्गातून मधुमेह-मुक्त वर्गात आले.

ह्या आहार योजनेमुळे मला हलके आणि उत्साही वाटते. माझ्या या यशासाठी मी आदरणीय *डॉ दीक्षित* सरांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते कारण त्यांनीच ही सोपी आणि मोफत अशी आहार योजना जगासमोर आणली आहे. मी सदस्य असलेल्या सर्व व्हॉट्सॲप गटांपैकी भालेराव मॅडम आणि मी हा गट माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचा आहे. त्यांच्या समवेतच्या संभाषणांमुळे माझे आयुष्यच बदलून गेले. भालेराव मॅडम, प्रोत्साहन देणारे अन्य अनेक सुहृद आणि टेलिग्राम मधील सर्व सदस्य, ह्या सर्वांमुळेच एके काळी अशक्यप्राय वाटणारे माझे वजन कमी करण्याचे उद्दिष्ट मी साध्य करु शकले.

आहार योजना आणि व्यायाम ह्यांचे पालन आता मी आयुष्यभर करणार आहे. सर्व संबंधितांना पुनश्च एकदा धन्यवाद !

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts