यशोगाथा 6: तारीख 4 एप्रिल 2022
परिचय पत्र
नाव: स्मिता कुदळे
वय: ४४ वर्षे
उंची: १६० सेमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: पुणे, महाराष्ट्र
मोबाईल: ९८८११६०३७७
माझी परिवर्तन कथा
२०२० मध्ये लॉकडाउन मुळे शाळा, ऑफिस सगळे काही बंद होते. बाहेर काही मिळत नसल्याने घरी बरेच काही खाण्यात आल्यामुळे, आणि व्यायाम न केल्यामुळे सगळ्यांचेच वजन वाढले . मी देखील यातच मोडत होते पण मला वेळीच हे लक्षात आले आणि यूट्यूब वर सरांचे व्हीडीयो बघून मी *डॉ. दीक्षित जीवनशैली* चे पालन सुरु केले. लॅब बंद असल्याने रक्त तपासणी करणे शक्य नव्हते.
सकाळी ९.३० आणि संध्याकाळी ६.३० वाजता जेवणाव्यतिरिक्त फक्त पाणी आणि काळा चहा पीत असे. लॉकडाऊन संपल्यावर मी सगळ्या चाचण्या करून घेतल्या आणि दामले सरांना त्याचे अहवाल पाठवले. त्यांनी मला जीवनशैली बद्दल सम्पूर्ण माहिती दिली.
मग मी रोज ४.५ किलोमीटर चालावयास सरुवात केली. याचे परिणाम दिसून आले आणि माझे वजन ६६.३ पासून कमी होऊन ६० किलो झाले. पोटाचा घेर ६ सेमी. कमी झाला . मला मधुमेहाचा त्रास नव्हता.
मी दामले सरांचे मनापासून आभार मानते. त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले.
मी *डॉ. दीक्षित* सरांची कायम ऋणी राहीन . त्यांच्या या जीवनशैली मुळे मला निरोगी आणि फिट राहण्यात मदत मिळाली. सरांना त्यांच्यापुढील वाटचाली साठी खूप-खूप शुभेच्छा.