यशोगाथा 1: तारीख 14 एप्रिल 2022

0

यशोगाथा 1: तारीख 14 एप्रिल 2022

परिचय पत्र

नाव: चिंतामणी बळवंत बोडस
वय: ५८ वर्षे
उंची: १७९ सेमी.
व्यवसाय: सेवा निवृत्त, पोलीस बिनतारी संदेश विभाग
वास्तव्य: सांगली, महाराष्ट्र
मोबाईल: ९९२३३१५६२१

माझी परिवर्तन कथा

जास्त वजन आणि मधुमेह या दोन्ही गोष्टी माझ्या बाबतीत आनुवांशिक असल्याने मी सुरवाती पासून शारीरिक फिटनेस कडे लक्ष देत आलो. सन २०१७ पर्यंत नंतर नोकरीतील कामाचा व्याप, मानसिक ताण यामुळे वजन वाढत गेले.

मला पूजनीय कै श्रीकांत जिचकर सर आणि मा. *डॉक्टर जगन्नाथ दीक्षित जीवन शैली* बद्दल माहिती होती. आमच्या पोलीस मुख्यालय सांगली येथे मधुमेह रिव्हर्सल आणि वेट लॉस शिबीर आयोजित केले होते त्यामध्ये स्वतः *डॉक्टर दीक्षित* यांनी मार्गदर्शन केले होते.
माझे मित्र श्री मिलिंद कुंभोजकर यांचे सल्याने श्रीरंग केळकर सर यांना भेटून १ जून पासून सुरु होणाऱ्या समूहात जॉईन झालो. मग खऱ्या अर्थाने *डॉक्टर दीक्षित जीवन शैली* चे पालन सुरु झाले.

केळकर सर, भावना शहा, मेघना भिडे माझ्या ग्रुप अडमिन वंदना केळकर मॅडम यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन व अमृता ठाणेदार मॅडम यांनी रोज पाठविललेला डाएट चार्ट त्यामुळे जीवन शैली चे पालन करण्याची उमेद निर्माण झाली.
अभियान संपले त्यावेळी माझे वजन ९८ किलो पर्यंत कमी झाले होते मी व्यायाम हळूहळू वाढविला. मी आठवड्यातून ६ दिवस सकाळी ८ किलोमीटर चालतो व संध्याकाळी १५ किलोमीटर सायकलिंग करतो.

माझे वजन २४ मार्च रोजी ९०.८ किलो आणि एचबीएवनसी ५.२ अर्थात मधुमेह रहित श्रेणी मध्ये आहे. उपाशी पोटी इन्सुलिन १६.६ वरून ७.७८ झाले आहे. पोटाचा घेर ११२ पासून कमी होऊन ९८ झाला आहे. माझे वजन ८५ किलो पर्यंत कमी करण्याचे ध्येय आहे.
मी आता पूर्णपणे निरोगी आहे. माझी टाच दुखी, रक्त शर्करा, रक्तदाब बरे आहेत व मी खूप आनंदी आहे.
माझे वजन कमी झाल्याचे पाहून माझी पत्नी, मुले, सुना, नातेवाईक, मित्र यांनी सुद्धा ही जीवन शैली सुरू केली आहे.
ह्याचे सर्व श्रेय मी *डॉक्टर दीक्षित सर*, श्रीरंग केळकर सर आणि त्यांची टीम यांना देतो
मला गेल्या वर्षी ७५ डे वेट लॉस अभियान नाशिक मार्फत,व सध्या सुरु असलेल्या ९० डे अभियान सांगली यामध्ये ग्रुप एडमिन म्हणून काम करण्याची संधी मला केळकर सरांनी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. ही जीवन शैली मी या पुढे आयुष्यभर सुरू ठेवणार आहे व ह्या अभियानाचा कायम स्वयंसेवक राहणार आहे.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts