यशोगाथा : कपिल लोखंडे

0

यशोगाथा : कपिल लोखंडे

नाव: कपिल लोखंडे
वय: ३६ वर्षे
उंची: १७७ सें.मी
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य – पुणे
समूह: DRC Pune
भ्रमणध्वनी – ९८६०४१६८६८

माझी परिवर्तन कथा

डॉ. दीक्षित जीवनशैली हा माझ्यासाठी अत्यंत सकारात्मक अनुभवांपैकी एक आहे. मला जानेवारी २०२३ मध्ये झोपेचा खूप त्रास होता. खूप अस्वस्थ वाटत होते. ऑफिसमध्ये पण की पोझिशनच्या पोस्टवर होतो. कामाचा ताणही खूप होता. त्यातच नंतर मला दातदुखीच्या त्रासाला सुरुवात झाली. त्रास जेव्हा खूप वाढला तेव्हा डेंटिस्टकडे गेलो. दात काढावे लागतील असा त्यांनी सल्ला दिला व काही टेस्ट करायला सांगितल्या. सर्व टेस्टचे जेव्हा रिझल्ट आले तेव्हा मला शॉक बसला. माझे एचबीएवनसी ७.६% व शुगर १९० आली. डेंटिस्टने दात काढण्यास नकार दिला. व चार महिने शुगर पूर्ण नियंत्रित करुन मग परत यायला सांगितले. ॲटिबायोटिक देवून दातदुखी तात्पुरती थांबवली.
मग मी आणखीन नर्व्हस झालो. डॉ. दीक्षित सरांचे सर्व व्हिडिओ पाहिले व श्री. नावगे सरांना फोन केला. त्यांनी मला पुणे D R C चा पत्ता व फोन नं. दिला. सेंटरला भेट दिल्यानंतर श्री. अविनाश गोखले सरांनी सर्व जीवनपद्धती समजावून सांगितली. एक उर्जा व निश्चय घेऊन मी घरी आलो. त्यावेळी माझे वजन ८६ कि. म्हणजे उंचीच्या मानाने ९ कि. जास्त होते.
जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला कठीण गेले. पण मी या सर्व जीवनशैलीचा आनंद घेण्यास सुरुवात केली. १८ ऑगस्टला परत एचबीएवनसी टेस्ट केली. त्यावेळी ती ६ आली व वजनही ७८.७ एवढे कमी झाले. आता माझा उत्साह वाढला. दाताचे दुखणे पण खूप कमी झाले. झोपेची तक्रारही थोडी बहुत कमी झाली.
७ ऑगस्टला टेस्ट केल्यावर तर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण माझे एचबीएवनसी ५.६ आले व व माझे वजन ७६.२ कि. झाले होते. आज १५.०२.२०२४ ला माझे वजन ७३ कि. इतके आहे. डॉ. दीक्षित जीवनशैलीने माझ्या आरोग्यात आणि जीवनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आपला देश मधुमेहमुक्त्त करण्याच्या उद्देशाने आणि उद्दिष्टाने काम करणाऱ्या डॉ. दीक्षित सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मी खूप आभारी आहे. मी आयुष्यभर या जीवनशैलीचे पालन करेन व माझ्या मित्रपरिवारांना त्याबद्दल सांगण्याचा निश्चय केला आहे.

 

(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

Your email address will not be published.

Related Posts